राज्याची वाटचाल ‘उडता महाराष्ट्र’कडे? ड्रग्स प्रकरणात विरोधकांनी सत्ताधारी नेते अन् मंत्र्यांवर घेरलं
tv9 Marathi Special Report | ललित पाटील प्रकरणात खासदार संजय राऊत, आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्याची वाटचाल 'उडता महाराष्ट्र'कडे तर सुरु नाही ना?
मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | महाराष्ट्रातील ड्रग्स रॅकेट ललित पाटीलपर्यंतच मर्यादित राहिलं नाही. ड्रग्स प्रकरणात आता विरोधकांकडून सत्ताधारी नेते आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. अशावेळी राज्याची वाटचाल ‘उडता महाराष्ट्र’कडे तर सुरु नाही ना? असा प्रश्न निर्माण होतोय. ललित पाटील प्रकरणात खासदार संजय राऊत, आमदार रविंद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा सरकार आणि सरकारमधील मंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. धंगेकर आणि अंधारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकार, गृहखातं आणि पुणे पोलिसांवर जोरदार निशाणा साधलाय. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी दादा भुसे यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. ड्रग्स प्रकरणी ठाकरे गटानं आता चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलाय. 20 ऑक्टोबरला ठाकरे गटाच्या विराट मोर्चाची घोषणाच राऊतांनी केलीय. तर मोर्चा काढायचाच आहे तर मातोश्रीवर काढा, असा पलटवार नितेश राणे यांनी केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट