संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?

| Updated on: Mar 01, 2024 | 3:52 PM

'मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली. मोदींचा कल वाटला की उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावं. ज्या पक्षांनी आपल्याला फसवलं, आपला पक्ष संपवण्यासाठी कारस्थान झालं, त्यांच्यासोबत का जायचं?'

Follow us on

मुंबई, १ मार्च २०२४ : ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यानंतर भाजपसोबत जाण्याची चर्चा होती आणि ही चर्चा संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत सांगितली असा आरोप सुनील तटकरे यांनी केला. यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. राऊत म्हणाले, ‘असं काही झालं नाही. तटकरे खोटं बोलत आहेत. आम्ही राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन आम्ही कशाला सांगू. मोदींसोबतच्या बैठकीत काय झालं हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली. मोदींचा कल वाटला की उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावं. ज्या पक्षांनी आपल्याला फसवलं, आपला पक्ष संपवण्यासाठी कारस्थान झालं, त्यांच्यासोबत का जायचं अशी आमच्या बैठकीत चर्चा झाली.’ तर भाजपचे अनेक प्रमुख नेते आता उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे बडे नेते जाळं फेकण्याचं काम करत आहेत. आपण परत एकदा येऊ, बसू, आमच्या चुका झाल्या परत बसू. पण आम्ही त्यासंदर्भात रिअॅक्शन देत नाही. आम्ही महाविकास आघाडीत काम करतो. आम्ही शेवटपर्यंत आघाडीत राहू, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला. तर तटकरे काही ब्रह्मदेव आहेत का. तटकरेंकडे छाती आहे का. हिंमतबाज माणसाकडे छाती असते. त्यांच्याकडे कुठे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.