आमच्या आईला भाजपनं… सुनेत्रा पवारांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

| Updated on: Mar 31, 2024 | 3:09 PM

'आमचं घर फोडून आमच्या घरातील एक महिला त्यांना लागतेय, याचाच विचार करायला हवा... आमची माऊली, मोठी वहिनी ही आई समान असते. माझ्यावर जे संस्कार झालेत, त्यात आपल्या मोठ्या भावाची बायको ही आपल्या...', सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

मोठी वहिनी ही आईसमान असते, आमच्या आईला भाजपने निवडणुकीत उतरवलं, सुनेत्रा पवारांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले. माझी लढाई कुठल्याही व्यक्तिशी नाही तर ही लढाई वैचारिक आहे. आमचं घर फोडून आमच्या घरातील एक महिला त्यांना लागतेय, याचाच विचार करायला हवा… आमची माऊली, मोठी वहिनी ही आई समान असते. माझ्यावर जे संस्कार झालेत, त्यात आपल्या मोठ्या भावाची बायको ही आपल्या आई समान असते. त्यामुळे आमच्या आईला भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत उतरवावं लागतंय, भाजपचे नेते बारामतीत येऊन म्हणतात आम्हाला शरद पवार यांना हरवायचं. म्हणजे त्यांना विकास न करता हरवण्यासाठी लढायचंय, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published on: Mar 31, 2024 03:09 PM
निवडणूक रोख्यातून भाजपाचे बिंग फुटल्याने केजरीवाल यांना अटक, उद्धव ठाकरे यांचा आरोप
संभाजीनगरच्या जागेवर लोकसभा कोण लढणार? शिंदे गट की भाजप? संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले…