सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना नाही तर ‘या’ भावाच्या हातावर बांधली राखी

| Updated on: Aug 19, 2024 | 2:13 PM

संपूर्ण देशभरात आज रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजकीय वर्तुळातही अनेक नेते मंडळींतील भावा-बहिणींनी रक्षाबंधन साजरं केलं आहे. अशातच राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे रक्षाबंधनानिमित्त एकमेकांना भेटणार का? अशी चर्चाच सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातावर राखी न बांधता राजकीय क्षेत्रातील एका व्यक्तीच्या हातावर राखी बांधली. आज अजित पवार हे मुंबईत आहेत. तर सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांची भेट होणं तसं कठीण दिसतंय. अशातच सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर राखी बांधून घेणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. मात्र मी नाशिकमध्ये आहे. कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागत करेन, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. मात्र याच रक्षाबंधन सणाला सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली आहे. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नाशिक येथील चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली आणि शुभेच्छा दिल्यात.

Published on: Aug 19, 2024 02:13 PM
महाविकास आघाडीकडे दोनच योजना लाडकी मुलगा अन्…. देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका
ठरलं… विधानसभा लढवणार, माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा पक्ष अन् मतदारसंघ ठरला