हिंदू हा धर्म नसून…. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी केलं काय केलं मोठं वक्तव्य?

| Updated on: Jan 04, 2024 | 6:23 PM

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे खऱ्या अर्थाने कोणी आचरणात आणले असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले असल्याचे विधान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे

सातारा, ४ जानेवारी, २०२४ : हिंदू हा धर्म नसून जगण्याचा मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव ही संकल्पना रुजवली, आचरणात आणली. त्यांनी कधीही दुसऱ्या धर्माचा कधीच भेदभाव केला नाही. आज मात्र जती-जातीत कोणत्याही कारणांविना भेदभाव निर्माण केले जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली तर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे खऱ्या अर्थाने कोणी आचरणात आणले असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले असल्याचे विधान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. पुढे उदयनराजे भोसले असेही म्हणाले की, कारण नसताना प्रत्येक जण जिथे देव आहेत, शिवरायांचा विषय येतो तेथे वैयक्तिकरित्या केंद्रीत झालेले काही लोकं आहेत ते स्वार्थापोटी काहीह विधानं करतात आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असे भाष्य करत असताना उदयनराजे यांनी कळकळीचे आवाहन करत म्हटले, अशा लोकांनी राम मंदिराच्या माध्यमातून चांगले विचार आचरणात आणून तेढ निर्माण होईल असे विधानं करू नये.

Published on: Jan 04, 2024 06:23 PM
गॅरंटी गॅरंटी म्हणतात, पण मोदी गॅरंटी खरी नाही; शरद पवार यांनी उडवली खिल्ली
फोन टॅपिंग प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या रश्मी शुक्ला राज्याच्या पोलीस महासंचालक पदी