उदयनराजे कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर म्हणाले, तुमची लायकी काय रे…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. उदयनराजे यांनी थेट हल्लाबोल करत नव्या राज्यपालांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहे. राष्ट्रपती जसे देशाचे प्रमुख असतात तसे राज्यपाल […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात अवमानकारक उद्गार काढणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच भोवलं आहे. या विधानावरून राज्यपाल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. उदयनराजे यांनी थेट हल्लाबोल करत नव्या राज्यपालांकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहे. राष्ट्रपती जसे देशाचे प्रमुख असतात तसे राज्यपाल राज्याचे प्रमुख असतात त्यामुळे त्यांनी जपून बोललं पाहिजे, त्यांच्या विधानाकडे सर्वांचे लक्ष लागून असते. त्यांच्या विधानामुळे जातीजातीत वाद होऊ शकतात असेही उदयनराजे यांनी म्हंटलं आहे. पुढे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, शिवाजी महाराज यांनी युद्ध केलं ते जनतेला न्याय मिळून देण्यासाठी केला आहे, जे आपण करू शकत नाही. ज्यांची ऊंची नाही ते अशी विधाने करतात, अशी मोठी विकृती आपल्याला पाहायला मिळते, असे ते म्हणाले.