मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? शरद पवार आणि उदयनराजे यांच्या भेटीनंतर आंदोलन घेणार मागे?

| Updated on: Sep 02, 2023 | 10:20 PM

VIDEO | आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दाखल, भेटीनंतर मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

जालना, २ सप्टेंबर, २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी गावात आज दाखल होत शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. शरद पवार आणि उदयनराजे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “आमच्या मराठवाडा आणि मराष्ट्रातला 50 टक्के आतला विषय आहे. आम्ही पूर्वीपासून 50 टक्क्यांच्या आतमध्ये आहोत. आमच्या मागण्या मान्य करा. आमच्या माता-माऊलींवर विनाकारण इतका भ्याड हल्ला केलाय की राज्यात, देशात असा हल्ला झाला नव्हता. हा हल्ला करणाऱ्यांना आधी निलंबित करा. आमच्यावर 307 सारखे खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही तेही राजेंना सांगितलं”, असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. तर “राजेसाहेबांनी शब्द दिलाय की, मी दोन दिवसाच्या आत बैठक घेतो. दुसरा शब्द दिलाय की, तुमचा एसपीसुद्धा ठेवत नाही. माझ्या माता-माऊलींवर अन्याय करणाऱ्या कुणालाही ठेवत नाही. तुमचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो, असं उदयनराजेंनी शब्द दिलाय. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते शंभर टक्के मार्ग काढतील”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. एसपींना घालवतो. त्यांनी माता-माऊलींना मारलं आहे. तुमचे गुन्हेही मागे घ्यायला लावतो. तुमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावतो. त्यामुळे आम्ही जनता राजेंवर खूश आहोत. आमचा प्रश्न मार्गी लावावा. आमचे देवच राजे आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Sep 02, 2023 10:20 PM
आमदार रवींद्र धंगेकर पुन्हा भडकले, म्हणाले ‘माझा विजय अजूनही पचत नाही…’
Eknath Shinde यांनी मराठा समाजाला दिली ग्वाही; म्हणाले, ‘हे शासन खंबीर अन्…’