हार्मोनियम वाजवत ठाकरे गटाचे खासदार भजनात तल्लीन, बघा व्हिडीओ
VIDEO | लांजा कोट सुतारवाडी येथे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळी ते भजनात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले
सिंधुदुर्ग : राजकीय वर्तुळात नेते मंडळी एकमेकांवर नेहमी आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. कुणावर तरी टीका करणं, कुणाच्या आरोपावर प्रत्युत्तर देणं हे आपल्याला नेहमीच पाहायला मिळत. राजकारणी म्हटले की आपण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. पण राजकीय नेत्यांमध्ये सुद्धा काही कलागुण दडलेले असतात. असाच अनुभव लांजा तालुक्यातील कोट गावातील नागरिकांनी घेतला. या भागात दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी चक्क भजन म्हणत आपल्या मधील भजनीबुवाचा पैलू पुन्हा एकदा उलगडून दाखवला. लांजा कोट सुतारवाडी येथे खासदार विनायक राऊत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ते भजनात तल्लीन झाले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Published on: Apr 07, 2023 11:51 AM