… उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेतील अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विनायक राऊत म्हणाले, मराठा आरक्षण हा राज्य सरकारच्या हातातील विषय राहिलेला नाही तर आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, अशी मागणी केली
नवी दिल्ली, ६ डिसेंबर २०२३ : गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, ही मागणी कायम ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम ठेवत राज्यभरात एल्गार पुकारला आहे. अशातच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. तर संसदेच्या अधिवेशन सुरू असताना दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेच्या अधिवेशनात गाजला. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेतील अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विनायक राऊत म्हणाले, मराठा आरक्षण हा राज्य सरकारच्या हातातील विषय राहिलेला नाही तर आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, असे म्हणत विनायक राऊत यांनी मागणीही केली आहे.