Datta Bharne | MPSC सदस्य नियुक्तीची फाईल राज्यपालांनी मंजूर करावी : दत्ता भरणे

| Updated on: Aug 04, 2021 | 3:48 PM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पाडण्याची गरज आहे. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आलीय.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलाखत प्रक्रिया पाडण्याची गरज आहे. मुलाखत घेणाऱ्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीची फाईल राज्य सरकारकडून राज्यपालांकडे पाठवण्यात आलीय. तर, राजभवनाकडून ही फाईल 2 ऑगस्ट म्हणजेच सोमवारी मिळाल्याचं सांगण्यात आलंय. आता ठाकरे सरकारमधील सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. एमपीएसी सदस्य नियुक्तीची फाईल मंजूर करावी, अशी विनंती राज्यपालांना करणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं आहे. MPSC सदस्य नियुक्तीच्या फाईल राज्यपालांनी तात्काळ मंजूर करावी यासाठी राज्य सरकारकडून राज्यपालांना विनंती करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता भरणे आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत. दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन विनंती करणार आहेत.

50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2.30 PM | 4 August 2021
Suresh Kakani | मुंबईकरांवर साथीच्या आजारांचे संकट, योग्य ती काळजी घेण्याचे पालिकेचे आवाहन