MPSC चे विद्यार्थी पुणे शहरात पुन्हा करणार आंदोलन, आता कोणती मागणी घेऊन रस्त्यावर?
VIDEO | वारंवार MPSC चे विद्यार्थी का करताय आंदोलन, आता काय आहेत त्यांच्या मागण्या?
पुणे : विविध मागण्यांसाठी MPSC चे विद्यार्थी पुन्हा आंदोलन करणार आहे. यापुर्वी MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. एमपीएससी परीक्षेचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी आंदोलन करणार आहे. पुण्यात १७ फेब्रवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. पुण्यातील अलका टॉकीज चौकात MPSC विद्यार्थी आंदोलन करणारं आहेत. एमपीएससीचा नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा आणि आयोगाने या निर्णयाची अंबलबजावणी करावी या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करणार आहेत. कारण राज्य सरकारने नवीन पॅटर्नबद्दल निर्णय जाहीर केला असला तरी त्याची अंमलबजावणी अजूनही अधिकृतरित्या केलेली नाही. लवकरात लवकर हा निर्णय व्हावा यासाठी विद्यार्थी आंदोलन करणार आहेत.