लोकलचा मेगा ब्लॉक… चाकरमान्यांसाठी ‘लालपरी’ धावली, पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी जादा ST बसेस
तीन दिवसीय प्रदीर्घ काळासाठी मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकदरम्यान, ९५६ अर्थात २३ टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. त्याचवेळी ७२ मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आल्यात. यामध्ये पुण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचा समावेश आहे. अशातच पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी लालपरी धावली आहे.
मध्य रेल्वेकडून ठाणे रेल्वे स्थानक आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या रेल्वे स्थानकातील फलाट रुंदीकरण आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी तब्बल 63 तासांचा विशेष ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या ब्लॉकचे काम गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरु झाले असून ते रविवार 2 जूनच्या दुपारनंतर संपणार आहे. अशा या तीन दिवसीय प्रदीर्घ काळासाठी मध्य रेल्वेकडून घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकदरम्यान, ९५६ अर्थात २३ टक्के लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. त्याचवेळी ७२ मेल एक्सप्रेस देखील रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये पुण्याच्या दिशेकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचा समावेश आहे. अशातच पुण्याहून मुंबई आणि मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीसाठी लालपरी धावली आहे. मुंबईसाठी पुणे एसटी विभागाकडून जादा एसटी बसेस सोडण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरील फलाटांच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द असल्याने पुण्याहून मुंबईकडे जाण्यासाठी ४० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. रेल्वे गाड्या रद्द असल्याने एसटीवर प्रवाशांचा ताण पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून जादा गाड्याचं नियोजन करण्यात आले आहे.