MSRTC : ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री, किती झाली भाडेवाढ?

| Updated on: Nov 04, 2023 | 12:13 PM

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर 'लालपरी'ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिवाळीच्या हंगामात सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ

Follow us on

मुंबई, ४ नोव्हेंबर २०२३ | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या हंगामात एसटी महामंडळाकडून १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार एसटीने या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू करण्यात येणार आहे. तसेच, ज्या प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केले आहे, त्यांच्या तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे, असेही एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.