MSRTC Employee Salary : खायचं काय? जगायचं कसं? एसटी कर्मचाऱ्यांचा इतका महिन्याचा पगार रखडला

| Updated on: Jan 11, 2024 | 1:23 PM

एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, सातवं वेतन मिळावं यासाठी गेल्या वर्षांत आझाद मैदानावर आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. मात्र त्यावेळीही सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासादायक न्याय मिळाला नव्हता. त्यानंतर यंदा पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई, ११ जानेवारी, २०२४ : एसटी कर्मचाऱ्यांचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ, सातवं वेतन मिळावं यासाठी गेल्या वर्षांत आझाद मैदानावर आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. मात्र त्यावेळीही सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासादायक न्याय मिळाला नव्हता. त्यानंतर यंदा पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांचा पगाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जानेवारी महिन्यातील १० दिवस उलटून गेले तरी एसटी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यातील पगार मिळाला नाही. तर सवलत प्रतिपूर्तीची रक्कम एसटी महामंडळाच्या खात्यात आली नसल्याने पगार रखडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. इतकंच नाहीतर खायचं काय? आणि जगायचं कसं? असा सवाल आता एसटी कर्मचाऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

Published on: Jan 11, 2024 01:23 PM