MSRTC Employees Strike : ST विलीनीकरणावरून तिघांची पलटी, अनेक डेपो बंद, कर्मचाऱ्यांचा सरकारला थेट इशारा

| Updated on: Sep 04, 2024 | 10:50 AM

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमुळे राज्यभरात विविध बस डेपोतील बसेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तर दुसरीकडे तीन वर्षापूर्वी ज्या नेत्यांनी एसटी विलीनीकरणाच्या मागणीवरून संप पुकारला होता त्यांची भूमिका आता बदलल्याचे दिसतेय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन करून अनेक बस डेपोमध्ये बंद पाळला गेला. तर दुसरीकडे राज्यसरकार आणि एसटी संघटनेची बैठक निष्फळ ठरली. त्यात महाविकास आघाडी सरकार असताना वकील गुणरत्न सदावर्ते, भाजप आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी एसटी विलीनीकऱणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. तेच आता विलीनीकऱण शक्य नसल्याचे म्हणताय. विविध १० ते १५ एसटी संघटनांनी धरणे देत अनेक डेपोत बंद पाळला. राज्यसरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्ता, घरभाडं मिळावं आणि एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार वेतन वाढ मिळावी. ही प्रमुख मागणी एसटी आंदोलकांची आहे. तर या मागणीकरता ३५ एसटी डेपोमध्ये पूर्ण बंद पाळला गेला. इतर डेपोमध्ये अंशतः बंद पाळण्यात आला. तर ठाणे विभागात कल्याण, विठ्ठलवाडी येथे एसटी बंद होती. तर मराठवाड्यात लातूर, नांदेड विभागात एसटी बंदला पाठिंबा मिळाला. यासह इतर विभागातही बंद पाळला गेला. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 04, 2024 10:50 AM
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताय? 5 सप्टेंबरपासून ‘या’ वाहनांना बंदी
Cm Ladki Bahin Yojana : झोल करावा तरी केवढा! लाडकी बहीण 1, अर्ज केले 26 अन् एकाच महिन्यात मिळवले 4 वर्षांचे पैसे