MSRTC Employees Strike : ‘लालपरी’चा संप मिटणार की चिघळणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपूर्वी गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत काय म्हणाले?

| Updated on: Sep 04, 2024 | 12:50 PM

ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना एसटी संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यासाठी राज्यभरात धरणे आंदोलन करून अनेक बस डेपोमध्ये बंद पाळला गेला. तर दुसरीकडे राज्यसरकार आणि एसटी संघटनेची बैठक निष्फळ ठरली. आज संध्याकाळी ७ वाजता मुख्यमंत्री शिंदे कोणता निर्णय घेणार?

Follow us on

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्माचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, अशी त्यांची प्रमुख मागणी ही गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. या मागणीच्या संदर्भात मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात अनेक बैठका झाल्यात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांचा विषय समजून घेतला आहे. तर आज संध्याकाळी ७ वाजता होणाऱ्या बैठकीत राज्यातील एसटी कर्माचऱ्यांबाबत आम्ही साकारात्मक भूमिका घेऊ असे आश्वासन देताना राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर असल्याने कोकणात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक कोकणात बसने जात असताता त्यामुळे अशा काळात एसटी आंदोलन करू नये, आपण सरकारला सहकार्य करावं आणि सरकारही तुमच्या सोबत असल्याचे म्हणत सदाभाऊ खोत यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलंय. तर आज होणाऱ्या 7 वाजताच्या बैठकीत तोडगा निघेल, असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.