MSRTC employees Strike : ‘लालपरी’ची चाकं पुन्हा थांबणार, एसटी कर्मचारी ‘या’ दिवसापासून संपावर, कोणत्या मागण्यावर ठाम?

| Updated on: Jul 30, 2024 | 12:59 PM

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन द्या, अशी प्रमुख मागणी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची आहे. या मागणीकरता येत्या ९ ऑगस्टपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यभरातील १३ एसटी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन द्या, अशी प्रमुख मागणी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची आहे. या मागणीकरता येत्या ९ ऑगस्टपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात राज्यभरातील १३ एसटी कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, या मागणीसह कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारा थकबाकी महागाई भत्ता मिळावा, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ थकबाकी अदा करावी, सन २०१६-२०२० या कालावधीसाठी जाहिर केलेल्या रू.४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कम वाटप करावी आणि सर्वच कामगारांच्या मूळ वेतनात सरसकट ५००० रुपयांची वाढ करावी, अशादेखील काही मागण्या एसटी कर्मचाऱ्यांचा आहेत. दरम्यान, २०२१ साली महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घ आंदोलन केले होते. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे राज्यातील दळणवळण ठप्प झाले. सलग ५४ दिवस सुरू असलेला संप २० डिसेंबर २०२१ रोजी मागे घेतला होता. त्यानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या. आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Published on: Jul 30, 2024 12:59 PM
‘चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या पेनड्राईव्हमध्ये, सगळं उघड…’, शरद पवार गटातील महिला नेत्याचा थेट इशारा
घासलेट चोर अन् टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक… मनसे नेत्याचा कुणाला खोचक टोला?