Gondia Shivshahi Accident : गोंदियात ‘शिवशाही’चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

| Updated on: Nov 29, 2024 | 4:04 PM

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ ही शिवशाही बस पलटी झाली आहे. ही शिवशाही बस भंडाऱ्याकडून गोंदियाच्या दिशेला जात होती. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या काचा फुटल्या आणि आत असलेले प्रवासी हे खिडकीच्या बाहेर फेकले गेल्याची माहिती आहे.

गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ ते २० जणं गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. झालेल्या या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ ही शिवशाही बस पलटी झाली आहे. ही शिवशाही बस भंडाऱ्याकडून गोंदियाच्या दिशेला जात होती. हा अपघात इतका भीषण होता की बसच्या काचा फुटल्या आणि आत असलेले प्रवासी हे खिडकीच्या बाहेर फेकले गेल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. गोंदियामध्ये झालेल्या भीषण एसटी अपघातानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मृतांना तातडीने १० लाख रुपये मदत म्हणून देण्याचे आदेश परिवहन प्रशासनाला दिले आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Published on: Nov 29, 2024 04:04 PM