Raigad ST Bus Accident | मुंबई-गोवा महामार्गावर एसटीची ट्रकला मागून धडक, कुठं अन् कसा झाला अपघात?
VIDEO | मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसची ट्रकला मागून जोरदार धडक, गणेशोत्सवासाठी एसटी मुंबईहून राजापूरकडे जात असताना झाला भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यू तर १५ जण जखमी असल्याची माहिती
रायगड, १७ सप्टेंबर २०२३ | मुंबई गोवा महामार्गावर आज एक पहाटे भीषण अपघात झाला. मुंबई गोवा महामार्गावर आज पहाटे एसटी बसने एका ट्रकला मागून धडक दिली आणि भीषण अपघात झाला. हा अपघात रायगडच्या माणगाव नजीक रेपोलीजवळ पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. तर गणेशोत्सवासाठी ही एसटी बस मुंबईहून राजापूरकडे जात होती. यावेळी हा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर २५ हून अधिक प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमी प्रवाशांना माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. MH 14 BT 2664 ही एसटी बस मुंबईकडून राजापूरकडे जात होती. दरम्यान, या भीषण अपघाताचे कारण अद्याप समोर आले नसून अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Published on: Sep 17, 2023 03:57 PM