MSRTC Viral Video : ‘आता सांगा मी नेमकं बसमध्ये कसं चढू?’, व्हायरल होणाऱ्या एसटी बसचं खरं वास्तव काय?
एसटी महामंडळात दाखल झालेल्या एसटी बसमध्ये नेमकं चढायचं कसं याची कैफियत मांडणारा व्हिडीओ दोन दिवसांपासून व्हायरल झाल्याचे दिसत आहे. तर त्याला उत्तर देणारा एक व्हिडीओ एका चालकाने तयार करून सोशल मीडियात शेअर केला.
एसटी महामंडळाच्या काही एसटी बसमध्ये एसटी ड्रायव्हरने नेमकं बसायचं तरी कसं? याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताय. एसटी महामंडळात दाखल झालेल्या एसटी बसमध्ये नेमकं चढायचं कसं याची कैफियत मांडणारा व्हिडीओ दोन दिवसांपासून व्हायरल झाल्याचे दिसत आहे. तर त्याला उत्तर देणारा एक व्हिडीओ एका चालकाने तयार करून सोशल मीडियात शेअर केला. मात्र नेमकं काय खरं आणि काय खोटं आता हेच समोर आलं आहे. कारण एका दुसऱ्या व्हिडीओमध्ये या नव्या बसेसमध्ये नेमकं चढायचं कसं याचं प्रात्याक्षिकच एका बस ड्रायव्हरकडून करून दाखवण्यात आलंय. मात्र या व्हायरल होणाऱ्या दोन्ही व्हिडीओतील चालकांच्या उंचीत फरक असल्याचे दिसून येत आहे. जेव्हा याचं सत्य तपासण्यात आलं तेव्हा या दोन्ही पद्धती खोडून तिसरंचं व्हर्जन समोर आलं. ते म्हणजे थेट प्रवासी दारातून चालक बसमध्ये चढत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी व्हायरल होणारा व्हिडीओ कसा चुकीचा आहे याचं स्पष्टीकरण दिलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट