MSRTC ST Employees Strike : एसटी आंदोलनाचा मुद्दा चिघळणार? पडळकरांसह सदाभाऊ खोत ‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांसाठी मैदानात

| Updated on: Sep 03, 2024 | 4:36 PM

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसह आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर असल्याने लालपरीची चाकं थांबली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचारी संघटनांच्या आंदोलनात उतरणार आहे. यासोबत सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनाही आंदोलनात उतरणार आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार लागू करा, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी सरकारकडे केली आहे. तर रात्री १२ पासून चक्काजाम करून संप करावा, आम्ही पाठिशी आहोत, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी बेमुदत संपाची हाक देणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. ‘एसटी कर्मचा-यांनी आज रात्री 12 पासून चक्का जाम करून संप करावं आम्ही पाठीशी आहोत, असे गोपीचंद पडळकर म्हणाले तर राज्य सरकारच्या कर्मंचा-यांप्रमाणे एसटी कर्मचा-यांना पगार मिळावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. पुढे ते असेही म्हणाले, एसटी महामंडळाचं विलनीकरण हे करता येत नाही. विलनीकरण होत नाही याची क्लिरिटी सर्वांना आहे. एसटी अधिका-यांनी महिन्याभरात 410 कोटी रूपये खर्च होतो, असं सांगितलं मात्र व्यवस्थापकीय संचालकांनी पगार द्यायला हवा पण ते पगार देत नाही, असे पडळकर यांनी सांगितले.

Published on: Sep 03, 2024 04:35 PM
महाराजांचा 100 फुटी भव्य पुतळा तयार होण्याआधीच तडे, निकृष्ट दर्जाचं काम की हलगर्जीपणा?
MSRTC Employees Strike : ‘सदावर्ते म्हणजे एसटीला लागलेला ‘डाग’, केवळ भुंकत राहायचं…’, कुणी केली जहरी टीका?