Special Report | राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढणार?
आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला.
साहेब, तुम्हाला हातजोडून विनंती आहे… आम्हाला सातवा वेतन आयोग लागू करा. मग विलिनीकरणाची प्रक्रिया सुरूच राहिल. पण आता वेतन आयोग लागू झाला नाही. पगार वाढला नाही तर आज 37 कामगार गेले. उद्या हा आकडा 370 होईल. त्यामुळे साहेब, तुम्हीच या प्रकरणात लक्ष घाला. तुम्हीच आमचे तारणहार आहात, असा आर्त टाहो एसटी कामगारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोर फोडला. आता यानंतर राज ठाकरेंच्या मदतीने या सर्वावर काही तोडगा काढला जाणार का? यावर हा स्पेशल रिपोर्ट…