ट्रिपल इंजिन सरकारचा लवकरच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार, कुणाची नावं चर्चेत? कुणाची खाती बदलणार?

| Updated on: Jun 17, 2024 | 11:19 AM

राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरू होत आहे. बहुप्रतिक्षीत तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या मंत्रिमंडळात तिनही पक्षाकडून कोणाची वर्णी लागेल? कुणाचा पत्ता कट होईल? यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जातायंत.

राज्याचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरू होत आहे. त्यापूर्वीच बहुप्रतिक्षीत तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या मंत्रिमंडळात तिनही पक्षाकडून कोणाची वर्णी लागेल? कुणाचा पत्ता कट होईल? यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जातायंत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतून भाजपचे नेते गणेश नाईक, कणकवलीतून नितेश राणे, पर्वती येथील माधुरी मिसाळ, सातारा येथून शिवेंद्र राजे भोसले, मुंबईतून अतुल भातखळकर आणि तुळजापुरातून राणा पाटील, निलंगा येथून संभाजी निलंगेकर, सुरेश धस यांच्याही नावं चर्चेत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय शिरसाट, आशिष जैस्वाल, भरत गोगावले यांची नावं चर्चेत आहेत. तर अजित पवार यांच्याकडून संग्राम जगताप आणि अण्णा बनसोडे यांची नावं चर्चेत आहेत. तर कोणत्या नेते, मंत्री यांची खाती बदलली जावू शकतात बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 17, 2024 11:19 AM
Kanchanjunga Express Accident : पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक, अनेक बोगी उलटल्या अन्…
Maharashtra Rain Forecast : राज्यातील Monsoon रखडला… आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्याला IMD कडून अलर्ट