Lalbagcha Raja video: लालबागच्या राजाचं मुखदर्शन, घरबसल्या घ्या राजाचं दर्शन

| Updated on: Aug 29, 2022 | 7:16 PM

विघ्नहर्त्या राजाच्या मुखदर्शनानं मुंबईत गणेशोत्सवाला खऱ्याअर्थी सुरुवात झाली, असेच म्हणावे लागेल. 31 तारखेला गणरायाचं आगमन घरोघरी होणार आहे. त्यानंतर 10  दिवस हा आनंद सोहळा घरोघरी साजरा होणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनालाही यावेळी मोठी गर्दी होईल, अशी शक्यता आहे.

मुंबई- सगळ्या मुंबईसह देशाचं लक्ष लागून असलेल्या लालबागच्या राजाच्या (Lalbag Raja)मुखदर्शनाचा सोहळा आज पार पडला. ज्या राजाच्या दर्शनाची उत्सुकता सगळ्या गणेशभक्तांना (Ganesh devotees) असते, त्या राजाच्या समोरचा पडदा उघडला गेला, आणि भाविकांनी मने आनंदाने तृप्त झाली. राजाचं त्याच्या नेहमीच्या रुपातलं दर्शन घेताना तिथे आलेले सगळेच भाविक हरखून गेले. यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वासच त्या राजाच्या दर्शनातून पाहायला मिळाला. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने मुंबईसह (Mumbai)राज्यभरात पाहायला मिळणार आहे. विघ्नहर्त्या राजाच्या मुखदर्शनानं मुंबईत गणेशोत्सवाला खऱ्याअर्थी सुरुवात झाली, असेच म्हणावे लागेल. 31 तारखेला गणरायाचं आगमन घरोघरी होणार आहे. त्यानंतर 10  दिवस हा आनंद सोहळा घरोघरी साजरा होणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनालाही यावेळी मोठी गर्दी होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे राजाच्या मंडळानेही त्याची पूर्ण तयारी करुन ठेवली आहे.

Published on: Aug 29, 2022 07:16 PM
Gulabrao patil: स्त्री रोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
Rohit Pawar : त्यांना आरोप करु द्या, योग्य वेळी उत्तर दिले जाईल