Ayodhya Ram Mandir : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मुकेश अंबानी यांची Antilia उजळली

| Updated on: Jan 21, 2024 | 11:56 PM

भारतीय उद्योगातील अनेक दिग्गजांनाही अयोध्या भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. एकीकडे रामलल्लाच्या सोहळ्यासाठी देशभरात उत्सवासारखी जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच मुकेश अंबानी यांचे घर असलेल्या अँटिलियावर जय श्री रामचा नारा चमकत आहे.

मुंबई, २१ जानेवारी २०२४ : अयोध्येत सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. या सोहळ्यासाठी सुमारे सात हजार मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. यापैकी मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, कुमार मंगलम बिर्ला, एन चंद्रशेखरन, अनिल अग्रवाल, एनआर नारायण मूर्ती यांसारख्या भारतीय उद्योगातील अनेक दिग्गजांनाही अयोध्या भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. एकीकडे रामलल्लाच्या सोहळ्यासाठी देशभरात उत्सवासारखी जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येलाच मुकेश अंबानी यांचे घर असलेल्या अँटिलियावर जय श्री रामचा नारा चमकत आहे. सध्या हेच अँटिलियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनुसार, अयोध्येतील राम मंदिरात राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी अँटिलियाला सजवण्यात आले आहे.

Published on: Jan 21, 2024 11:50 PM
असं असणार अयोध्येतील भव्य दिव्य डोळे दिपवणारं राम मंदिर, रामलल्लाच्या बाजूला आणखी कुणाची मंदिरं?
Ayodha Ram Mandir : अयोध्येतील शरयूच्या तीरावर रामभक्तांची गर्दी, पवित्र नदीत स्नान