Nanded | नांदेडच्या मुखेडमध्ये यंदाही पावसाची प्रतिक्षा, पिकांचे मोठे नुकसान
कायम दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या मुखेड तालुक्यात यंदाही चिंताजनक स्थिती आहे. दमदार म्हणावा अश्या पावसाने मुखेड तालुक्यात अद्याप हजेरी लावलीच नाही.
कायम दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या मुखेड तालुक्यात यंदाही चिंताजनक स्थिती आहे. दमदार म्हणावा अश्या पावसाने मुखेड तालुक्यात अद्याप हजेरी लावलीच नाही. त्यामुळे धूळ पेरणीसह पाऊस आल्यानंतर केलेल्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत. पावसा अभावी पिकांची वाढच होत नसल्याने बळीराजा चिंतातुर झालाय. मुखेड तालुक्यातील जाहूर आणि आंबूलगा परिसरात तर पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आभाळाकडे नजर ठेवून बसलाय. तर लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाच्या भीतीने पछाडलंय.