लाडक्या बहिणीनंतर आता मुख्यमंत्र्यांचे भाऊही लाडके…शिंदेंकडून नव्या योजनेची घोषणा, कोण पात्र अन् अटी काय?
Mukhyamantri Ladka Bhau Yojana : पंढरपूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या घोषणेनंतर आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगताना दिसतोय. या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्रात चर्चाही ती लाडका भाऊ योजनेची… लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या भावांसाठी सरकारने एक नवी घोषणा केली आहे. दरम्यान, पंढरपूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या योजनेच्या घोषणेनंतर आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगताना दिसतोय. या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार? काय आहे या योजनेच्या अटी? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी ५ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तरूणांचे वय हे १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या तरूणांना दरमाहा ६ हजार रूपये मिळणार आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रूपये मिळणार असून पदवीधर तरूणांना १० हजार रूपये इतकं मानधन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आली.