Aryan Khan | आर्यन खानचा आजचा मुक्काम तुरुंगातच, हायकोर्टात 27 ऑक्टोबरला पुढील सुनावणी
आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला.पण अखेर आजची सुनावणी स्थगित झाली असून ही सुनावणी उद्या होणार आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावरील आजच्या (Aryan Khan Bail) सुनावणीला स्थगिती देण्यात आली आहे. उद्या म्हणजेच 27 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा या जामीन अर्जावर युक्तिवाद होईल. आज दिवसभरात फक्त आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी (Mukul Rohatgi) यांनी बाजू मांडली. उद्या दुसऱ्या बाजूने युक्तिवाद होणार आहे. क्रूझ रेव्ह आणि ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असेलल्या आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्च केलेला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी मांडली.