Multi-Member Ward System: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच योग्य, कोर्टाचा राज्य सरकारला दिलासा
Multi-Member Ward System: स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच योग्य असल्याचा निर्वाळाही कोर्टाने दिला आहे.
मुंबई: मुंबई हायकोर्टाने (mumbai high court) राज्य सरकारला (maha vikas aghadi) मोठा दिलासा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुप्रभाग सदस्यीय पद्धतच योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर कोर्टाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणाऱ्या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रभाग पद्धतीनेच होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन आठवड्यात घेण्याचे आदेश सरकारला दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय (obc reservation) स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.