VIDEO : Andheri | 6 जणांचा एकाच दुचाकीवरून प्रवास;पोलिसांकडून शोध सुरू
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एका बाईकवरुन तब्बल सहा जण प्रवास करताना दिसतेय. रमनदीप सिंह होरा या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी टॅग करत या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलीस या तरुणांचा शोध घेत असल्याची माहिती मिळतेय.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून बाईकवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये एका बाईकवरुन तब्बल सहा जण प्रवास करताना दिसतेय. रमनदीप सिंह होरा या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी टॅग करत या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलीस या तरुणांचा शोध घेत असल्याची माहिती मिळतेय. या तरुणांवर आता कारवाई कधी होणार, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. भर ट्रॅफिकमध्ये सहा हुल्लजबाज तरुणांची स्टंटबाजी समोर आली आहे. खरंतर नियमानं एका बाईकवर दोघांना जाण्यास परवानगी आहे. बाईकवर तिसरा व्यक्ती असेल, तर लगेचच वाहतूक पोलीस अशा बाईकस्वारांवर कारवाई करतात.
Published on: May 24, 2022 01:18 PM