मुंबईतील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 5 महिला गंभीर जखमी
मुंबईकरांचा आजचा दिवस धक्कादायक घटनेनं सुरु झाल्यानं कुर्ला घाटकोपर परिसरात खळबळ उडाली आहे. इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मातीचा डंपर ओलांडून एका केळेवाल्याचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे.
मुंबईकरांचा आजचा दिवस धक्कादायक घटनेनं सुरु झाल्यानं कुर्ला घाटकोपर परिसरात खळबळ उडाली आहे. इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मातीचा डंपर ओलांडून एका केळेवाल्याचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे. ही घटना पहाटे घडली आहे. एर्टिगा गाडीत बसलेल्या पाच महिलाही जबर जखमी झाल्या आहेत, जखमींवर राजावाडी रुग्णालयात ऊपचार सुरू आहेत. फायर ब्रिगेड, स्थानिक पोलीस, ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झालं आहे.