Mumbai Air Quality : मुंबईकरांनो काळजी घ्या! दिल्लीनंतर आता मुंबईची ‘हवा’ बिघडली
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा बिघडली असून अत्यंत वाईट श्रेणीत होती. त्यानंतर आता मुंबईतील हवेची नोंद वाईट श्रेणीत करण्यात आली आहे. मुंबईतील कोणत्या भागात पसरली आहे वाईट हवा... जाणून घ्या
दिल्लीनंतर आता मुंबईची ‘हवा’ बिघडली आहे. वायू प्रदुषणाच्या बाबतीत मुंबई शहर आता दिल्लीच्या बरोबरीला आल्याने मुंबईकरांना काळजी घेण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा बिघडली असून अत्यंत वाईट श्रेणीत होती. त्यानंतर आता मुंबईतील हवेची नोंद वाईट श्रेणीत करण्यात आली आहे. मुंबईची हवा बिघडल्याने मुंबईत दिवसभर धुक्यासारखे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळते. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा ३३० असा नोंदवण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीत असल्याने वाऱ्याचा वेग मंदावला आहे. त्यामुळे दक्षिण आणि मध्य हवा ही वाईट श्रेणीत नोंदवली आहे.
राज्यातील तापमानात घट होत असल्याने राज्यात अनेक भागात थंडी वाढली आहे. तापमान १० अंश सेल्सिअरवर नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसानाशी संबंधित आजार बळवण्यास सुरूवात झाली आहे.
Published on: Jan 16, 2023 10:17 AM