VIDEO : Ajit Pawar | ‘सरकार अल्टिमेटमवर नाही;कायद्यावर चालतं’;अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावलं

| Updated on: May 05, 2022 | 11:57 AM

काही मनसे कार्यकर्त्यांनी काल भोंग्यांच्या मुद्द्यावरून काही ठिकाणी परवानगी नसताना महाआरती करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर राज ठाकरे यांच्यावर अटी, नियमांचा भंग केल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. 

भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही नियमावली दिली आहे. त्यानुसार राज्यात परवानगी आहे. त्यामुळे कोणी अल्टिमेटम देणार असेल तर ते चालणार नाही. सर्व गोष्टी कायद्यानुसारच होणार. कोणाला अल्टिमेटम द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या. ही काही हुकूमशाही नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते. काही मनसे कार्यकर्त्यांनी काल भोंग्यांच्या मुद्द्यावरून काही ठिकाणी परवानगी नसताना महाआरती करण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर राज ठाकरे यांच्यावर अटी, नियमांचा भंग केल्याने त्यांना नोटीस देण्यात आली आहे.

Published on: May 05, 2022 11:56 AM
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 May 2022
VIDEO : Pandharpur मधील विठ्ठल मंदिरातील काकड आरती स्पीकरविना होणार