पावसाळ्याआधी अंधेरीचा गोखले पूल सुरू होणार? नाही झाल्यास पर्यायी व्यवस्था काय?
अंधेरीचा गोखले पूल कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. रेल्वेचं काम पावसाळ्याआधी पूर्ण झालं नाही तर उद्दिष्टाप्रमाणे मे महिन्यात एक लेन सुरू करता येणार नाही. मग पर्याय काय?
मुंबई : अंधेरीचा गोखले पूल कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या गोखले ब्रिजचं काम पालिकेकडून वेगाने सुरू आहे.रेल्वेचं काम पावसाळ्याआधी पूर्ण झालं नाही तर उद्दिष्टाप्रमाणे मे महिन्यात एक लेन सुरू करता येणार नाही. त्यामुळे पालिकेने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. यासाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग असणाऱ्या मिलन सबवेमध्ये पावसासाठी उच्च क्षमतेचे पोर्टेबल पंप तैनात करण्यात येणार आहेत. शिवाय संबंधित मार्गाची आवश्यक डागडुजीही करण्यात येणार आहे. सध्या या पुलाचं काम लवकर पूर्ण करून आमची वाहतूककोंडीतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Published on: Feb 23, 2023 03:47 PM