Mumbai | ‘लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल’ बसेस महिलांच्या सेवेत दाखल, ‘बेस्ट’ची महिलांना भाऊबीज भेट

| Updated on: Nov 06, 2021 | 5:31 PM

नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई ‘बेस्ट’कडून भाऊबीजेच्या दिवशी महिलांना एक खास भेट देण्यात आली आहे. शनिवारी भाऊबीजेचा मुहूर्त साधत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या लेडीज स्पेशल सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला.

नोकरी करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मुंबई ‘बेस्ट’कडून भाऊबीजेच्या दिवशी महिलांना एक खास भेट देण्यात आली आहे. शनिवारी भाऊबीजेचा मुहूर्त साधत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते बेस्ट उपक्रमाच्या लेडीज स्पेशल सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर आणि बेस्टचे महा ववस्थापक लोकेश चंद्र यांची उपस्थिती होती. मुंबईमध्ये लाखो महिला नोकरी करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असतात, अशा महिलांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षीत व्हावा यासाठी बेस्टकडून लेडीज फर्स्ट, लेडीज स्पेशल हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आजपासून मुंबईत 100 लडेजी स्पेशल बस धावणार आहेत. मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून बेस्ट बसेसची जगभरात ओळख आहे. बेस्ट बसेसने दररोज 30 लाख प्रवासी प्रवास करत असून यात महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. बेस्ट उपक्रमाच्या 27 बस आगारातून मुंबई शहर व दोन्ही उपनगरातील 100 बस मार्गावर ‘लेडीज फर्स्ट लेडीज स्पेशल’ बस सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बसेसमध्ये 90 बसेस या वातानुकूलित असणार आहेत. दरम्यान, सध्या शहरातील विविध मार्गावर बेस्टच्या 37 महिला स्पेशल बस धावतात. त्यात आता या आणखी 100 बसची भर पडल्यामुळे एकूण महिला स्पेशल बसची संख्या 137 झाली आहे. यामुळे गर्दीच्या वेळेस महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, महिलांचा प्रवस सुरक्षीत होण्यास मदत होणार असल्याची माहीत पेडणेकर यांनी दीली.

Deepak Kesarkar | नारायण राणेंनी मिळालेल्या खात्यात आपला परफॉर्मन्स दाखवावा
Narendra Modi | जखमींच्या तब्येतीत लवकर सुधारणा होऊ दे, नगरमधील घटनेवर मोदींकडून शोक व्यक्त