बेस्टचा मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे तब्बल 400 CNG बसेस सेवेतून केल्या कमी

| Updated on: Feb 23, 2023 | 10:51 AM

मागच्या काही दिवसांमध्ये बेस्ट बसला आग लागण्याच्या घटना वारंववार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. पाहा...

मुंबई : मागच्या काही दिवसांमध्ये बेस्ट बसला आग लागण्याच्या घटना वारंववार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या 400 सीएनजी बसेस सेवेतून कमी केल्या आहेत. अंधेरीच्या आगरकर चौक इथे बसला आग लागण्याची घटना घडली होती.या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झालेली. बेस्टची तिसरी बस जळण्याच्या घटनेनंतर मातेश्वरी या कंत्राटदाराच्या भाडेतत्वावरील 400 बसेस ताफ्यातून कमी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. मुंबईकरांना चांगली प्रवासी सुविधा देण्यासाठी आता बेस्टचा पुढील निर्णय काय असेल, हे पाहणं महत्वाचं असेल.

Published on: Feb 23, 2023 10:51 AM
‘त्या’ आरोपांचे परिणाम संजय राऊत यांना भोगावे लागणार; मंत्री अब्दुल सत्तार यांचा इशारा
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर पुन्हा सुनावणी;आज शिंदेगटाचा युक्तिवाद