VIDEO : Devendra Fadnavis Speech | फडणवीसांच्या कुणा-कुणालाजेलमध्ये ठेवण्यात आलं होतं?

| Updated on: Mar 14, 2022 | 1:58 PM

देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कालचे प्रश्न पाहिल्यावर याला काही राजकीय रंग असेल असं वाटतं. प्रश्न कुठे बदलले आणि कुणी बदलले हे मला माहीत आहे. मी कोणत्या घरातून येतो हे माहीत आहे का? इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवले.

पोलिसांच्या बदल्यांचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी साबर पोलिसांनी काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांचा जबाब नोंदवून घेतला. त्याचे आज विधानसभेत पडसाद उमटले. भाजप आमदार आशिष शेलार यांनी याबाबतचा एक स्थगन प्रस्ताव आज विधानसभेत मांडला. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर देताना फडणवीसांना या प्रकरणात गोवण्याचा कोणताही हेतू नसल्याचं स्पष्ट केलं. तर देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नावली बदलण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कालचे प्रश्न पाहिल्यावर याला काही राजकीय रंग असेल असं वाटतं. प्रश्न कुठे बदलले आणि कुणी बदलले हे मला माहीत आहे. मी कोणत्या घरातून येतो हे माहीत आहे का? इंदिरा गांधींनी माझ्या वडिलांना दोन वर्ष तुरुंगात ठेवलं. त्यांनी कोणताही गुन्हा केला नव्हता. माझ्या काकूंना 18 महिने तुरुंगात ठेवले. त्यांनीही कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही जेलला घाबरणारे नाही.

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 14 March 2022
आरोपी सोडून संन्याशाला फाशी का? भाजप नेत्यांचा सवाल