VIDEO : Pravin Darekar| विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर ST कंडक्टरांचा मुलगा म्हणून आलोय : प्रवीण दरेकर

| Updated on: Nov 10, 2021 | 3:50 PM

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आता निर्माण झालीय. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येनं जमले आहेत. या आंदोलनात आता भाजपनं उडी घेतलीय. विरोधी पक्षनेता म्हणून नाही तर ST कंडक्टरांचा मुलगा म्हणून आलोय असं यावेळी प्रवीण दरेकर म्हणाले. 

एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अधिक पेटण्याची शक्यता आता निर्माण झालीय. मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचारी हजारोंच्या संख्येनं जमले आहेत. या आंदोलनात आता भाजपनं उडी घेतलीय. आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून जायला नकोत. परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? असा खोचक सवाल करत दरेकर यांनी अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केलीय. सर्व एसटी कर्मचारी संघटनांना आवाहन आहे, तुमच्याकडे मोर्चा वळवायला लावू नका.

 

 

VIDEO : ST कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कारवाईची महामंडळाची इच्छा नाही | Anil Parab
ST Worker Strike | ..आंदोलन करु नका ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन