Mumbai Vaccination | मुंबई BKC केंद्रावर गेल्या आठवड्यापासून लसीकरणासाठी लांबच लांब रांग
मुंबईच्या बीकेसीतील कोरोना लसीकरण केंद्राबाहेर गेल्या एका आठवड्यापासून लसीकरणासाठी लांब रांग लागल्या आहेत. लोकांमध्ये सोशल डिस्टंसिंग नाही आणि मास्कही नाही. लसीकरणासाठी 600 मीटर लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. भर पावसात छत्र्या, रेनकोट घालून लोक लसीकरणासाठी पोहोचले आहेत.
मुंबईच्या बीकेसीतील कोरोना लसीकरण केंद्राबाहेर गेल्या एका आठवड्यापासून लसीकरणासाठी लांब रांग लागल्या आहेत. लोकांमध्ये सोशल डिस्टंसिंग नाही आणि मास्कही नाही. लसीकरणासाठी 600 मीटर लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. भर पावसात छत्र्या, रेनकोट घालून लोक लसीकरणासाठी पोहोचले आहेत. राजरोसच्या त्रासाला आता मुंबईकर कंटाळले आहेत. महिला, वयोवृद्ध आणि तरुणांची यावेळी तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. 200 डोससाठी हजारोंची रांग आहे. काहीजण सात दिवसांपासून लसीच्या प्रतिक्षेत आहेत.