Mumbai Local | मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 100 टक्के लोकल धावणार
मुंबईकरांसाठी एक गुडन्यूज आहे. गुरुवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या 100 टक्के लोकल फेऱ्या धावणार आहेत. त्यामुळे सामान्य मुंबईकरांचा प्रवास आता जलद होणार आहे किंबहुना त्यांना इच्छित स्थळी इच्छित वेळी पोहोचता येणार आहे. कोरोनानंतर वाढलेल्या प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात 60 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त 25 टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी 95 टक्क्यांहून 100 टक्के फेऱ्या गुरुवारी, (ता.28) रोजी पासून चालविण्यात येणार आहे.