मुंबईकरांनो तुमच्यासाठी मोठी बातमी… 23 ते 31 मेपर्यंत CSMT स्थानकात ब्लॉक, ‘या’ रेल्वे गाड्या रद्द

| Updated on: May 22, 2024 | 10:53 AM

२३ मे ते ३१ मेपर्यंत दररोज रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. चार तासांच्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस अशा रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे.

भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाच्या कामादरम्यान २३ मे ते ३१ मेपर्यंत दररोज रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत चार तासांचा रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. चार तासांच्या रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रगती एक्स्प्रेस, इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस अशा रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे. साधारण आठवडाभर घेण्यात येणाऱ्या रात्रकालीन ब्लॉक दरम्यान, भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाण्यासाठी लोकल उपलब्ध राहणार नाही. तर ब्लॉकपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून डाऊन धीम्या मार्गावरील १२.१४ ची कसारा लोकलही शेवटची असणार आहेत त्याचबरोबर पहिली सीएसएमटी ते कर्जत ही पहाटे ४.४७ लोकल असणार आहे.

Published on: May 22, 2024 10:53 AM
तो निष्ठांवत अन् कणखर, पित्याकडून मुलाचं कौतुक… गजानन किर्तीकर नेमकं काय म्हणाले? निवडणुकीनंतर इधर या उधर?
बीड मतदारसंघात बोगस मतदान? ‘त्या’ आरोपांनंतर वाद थेट निवडणूक आयोगात, नेमकं का घडलं?