VIDEO : CM Eknath Shinde On Vinayak Mete Death | मराठा समाजाला न्याय मिळेल असा विश्वास त्यांच्यामध्ये होता

| Updated on: Aug 14, 2022 | 9:41 AM

ज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल झाले असून यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज सकाळी विनायक मेटेंच्या निधनाची बातमी मला कळाली. पण हे अतिशय धक्कादायक आहे. ख

विनायक मेटेंच्या निधनाची बातमी ऐकून प्रत्येकजण मोठ्या धक्कात आहे. आज सकाळी साडेपाचच्या दरम्यान विनायक मेटेंच्या अपघात मुंबईला एका बैठकीला जात असताना झाला. अपघातानंतर त्यांना पनवेल येथील रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, दरम्यान त्यांचे निधन झाले. आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल झाले असून यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज सकाळी विनायक मेटेंच्या निधनाची बातमी मला कळाली. पण हे अतिशय धक्कादायक आहे. खरं म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करणारा नेता, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय देण्यासाठी अनेक आंदोलन केली. शिवाजी महारात स्मारकाचे ते अध्यक्ष देखील होते. समाजाला न्याय मिळवण्यासाठी त्यांची नेहमीच तळमळ होती, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.