Mumbai Costal Road : मरीन ड्राइव्ह ते वरळी अवघ्या 9 मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास सुपरफास्ट…कोस्टल रोडचा दुसरा बोगदा खुला
कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून खुला... आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 07 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. तर आठवड्याचे उर्वरित दोन दिवस प्रकल्पाच्या मेंटेनन्सचे काम केले जाणार आहे.
बहुचर्चित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा दुसरा भूमिगत बोगदा उत्तर दिशेने जाण्यासाठी आज दुपारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेसे असणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी जलद गतीने प्रवास करण्यासाठी आनंदाची बातमी आहे .यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव, याचबरोबर पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्याच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे. एकूण आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 07 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. तर आठवड्याचे उर्वरित दोन दिवस प्रकल्पाच्या मेंटेनन्सचे काम केले जाणार आहे.
Published on: Jun 10, 2024 02:38 PM