संजय राऊतांना 4 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावले आहेत. संजय राऊत यांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने समन्स बजावले आहेत. संजय राऊत यांना 4 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली. राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शौचालय घोटाळ्याच्या आरोपांनंतर संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकासनीची तक्रार मेधा किरीट सोमय्यांनी दाखल केली होती. 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपांखाली छळ आणि बदमानी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर ठेवण्यात आलाय.