Cruise Drug Case | माझे फोटो सॅम डिसुजा म्हणून व्हायरल केले, हैनिक बाफनांचा साक्षीदार प्रभाकरवर आरोप
मुंबईतील क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणात एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांचे खाजगी बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई क्रुज ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी आर्यन खानच्या सुटके साठी मागितलेल्या 25 कोटीतील 18 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना असून प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाईल फोटोचा दुरुपयोग केल्याची आणि या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
मुंबईतील क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर एनसीबीने केलेली कारवाई सध्या देशभर गाजत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत असून या प्रकरणात एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांचे खाजगी बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि साक्षीदार असलेले किरण गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका वृत्त वाहिनीवर प्रभाकर साईल यांनी दिलेल्या माहिती दरम्यान क्रुझवरील कारवाईनंतर बाहेर आल्यावर किरण गोसावीला सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. या संभाषणा दरम्यान 25 कोटीची मागणी करुन 18 कोटींवर फिक्स करुन त्यातील 8 समीर वानखेडेंना देऊ बाकी 10 आपण वाटून घेऊ, असे संभाषण गोसावी आणि सॅम दरम्यान झाल्याचा दावा प्रभाकरने केला होता.