VIDEO : सरकार आहे म्हणून चुकीच्या कारवाया नकोत-Devendra Fadnavis

| Updated on: Mar 07, 2022 | 1:02 PM

आमदार रवी राणांवर महाविकास आघाडी सरकार सुडापोटी कारवाई करत आहे. तुमच्या हातात सरकार आहे म्हणून चुकीच्या कारवाई करू नका, असा हल्ला सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर चढवला. विधानसभेत भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला घेरले

आमदार रवी राणांवर महाविकास आघाडी सरकार सुडापोटी कारवाई करत आहे. तुमच्या हातात सरकार आहे म्हणून चुकीच्या कारवाई करू नका, असा हल्ला सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकावर चढवला. विधानसभेत भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारला घेरले. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचा दावा केला. तुम्ही सूडबुद्धीने कारवाई कराल, तर तुमचा अनिल देशमुख होईल, असा इशारा त्यांनी दिला. मला विधानसभेत बोलू द्या, अन्यथा मी फाशी घेईन. रवी राणा दिसला की, त्याला गोळ्या घाला, असे आदेश दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

VIDEO : मुंबै बँक कर्ज घोटाळा प्रकरणी सरकारने चौकशी करावी : Suresh Das
VIDEO : नेत्याच्या गाडीवर चप्पल फेकणं महाराष्ट्राची संस्कृती नाही : Rohit Pawar