VIDEO : Sanjay Raut on Devendra Fadnavis | संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल
लोकशाहीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. हुकूमशाही काय आहे. कायदा सुव्यवस्था कोसळणं हे आपण पाहिलं पाहिजे. जिग्नेश मेवाणींना अटक करण्यात आली आहे.
लोकशाहीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. हुकूमशाही काय आहे. कायदा सुव्यवस्था कोसळणं हे आपण पाहिलं पाहिजे. जिग्नेश मेवाणींना अटक करण्यात आली आहे. मेवाणी यांनी मोदींविरोधात ट्विट केलं म्हणून त्यांना अटक केली. अटक करून अटक केली. हे कोणतं लक्षण आहे? हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? त्यावरही फडणवीसांनी मनमोकळं केलं पाहिजे. फडणवीसांच्या भावना समजून घेऊ शकतो. कारण त्यांना जी लोकशाहीची उबळ आली आहे राष्ट्राच्या हिताची आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.