MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5.30 PM | 7 November 2021

| Updated on: Nov 07, 2021 | 7:25 PM

मुंबई क्रूझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हे एक नाव समोर आलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

मुंबई क्रूझ ड्रग्स आणि आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हे एक नाव समोर आलं आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी सुनील पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता सुनील पाटील यांनी स्वत: माध्यमांसमोर येत या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. आर्यन खान प्रकरणात सुनील पाटील हा मास्टर माईंड असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, मी या प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. समीर वानखेडे यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही, असं स्पष्टीकरण सुनील पाटील यांनी एएनआयशी बोलताना दिलंय.

त्याचबरोबर गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये काहीच नव्हतं. राष्ट्रवादीचे नेते तिथे येत होते. शराब, कबाब असं सांगितलं जात आहे. मोहित कंबोजला सांगा मी दारू पीतच नाही. मी तिथे राहत होतो. पण पार्टीत नसायचो. सीसीटीव्ही फुटेज पाहा. त्यात कळेलच, असं सुनील पाटील यांनी म्हटलंय.

Aryan Khan Breaking | ड्रग्स केस प्रकरणात आर्यन खानला पुन्हा NCBकडून समन्स
Nana Patole | किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी काहीही फरक पडत नाही : नाना पटोले