Param Bir Singh | परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर सरकारी गाडी सोडली
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सरकारी गाडीचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर परमबीर सिंग मुंबई विमानतळावर दाखल झाल्यापासून ते सरकारी गाडीचा वापर करत होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सरकारी गाडीचा वापर बंद केला असल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातून दिलासा मिळाल्यानंतर परमबीर सिंग मुंबई विमानतळावर दाखल झाल्यापासून ते सरकारी गाडीचा वापर करत होते. परमबीर सिंग यांच्या सरकारी गाडीच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं होतं. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात कारवाईचा इशारा दिला होता. गृहमंत्र्यांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर परमबीर सिंग यांनी सरकारी गाडीचा वापर बंद केला आहे.