ब्रेकिंग! गडदुर्गांसाठीचा मोर्चा पोलिसांना अडवला! का काढण्यात आला होता मोर्चा? मागण्या काय?
हातात घोषणांचे फलक घेऊन निदर्शनं करत, जोरजोरात घोषणा देत यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. काय होती नेमकी आंदोलकांची मागणी?
मुंबई : गडदुर्गांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापलं जावं, अशी मागणी करत मुंबईत (Mumbai Breaking Update) आंदोलन करण्यात आलं. हिंदू बांधवांनी सीएसएमटी (CSMT) येथे मोर्चा काढत ही मागणी केली. दरम्यान हा मोर्चा पोलिसांनी अडवला. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अखेर हा मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना झाला. गडदुर्गांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं जावं, अशी मागणी या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरले होते. हातात घोषणांचे फलक घेऊन निदर्शनं करत, जोरजोरात घोषणा देत यावेळी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी (Mumbai Police) आक्रमक झालेल्या आंदोलकांना अडवलं आणि त्यांची समजूत घालण्याचाही यावेळी प्रयत्न केला.
Published on: Sep 18, 2022 11:27 AM